Saturday 19 May 2012

ओंजळी भरून घे ( तरही गझल )

वृत्त - चामर 
लगावली - गालगाल  गालगाल  गालगाल  गालगा 

आरसा नको बघूस तू , मला बघून घे
रूप आज डोळीयांत कैद , न्याहळून घे

गुंतलो सखी तुझ्या अ दं!मधी अता पुरा 
तोल आज जाऊ पाहि , आज सावरून घे

तीर मारती मला , नयन तुझे इथे तिथे 
जीव घेऊनी बळेच हासती , मिटून घे

लाजणे असे जणू , वसंत बहरला जसा
धुंद या क्षणांमधी , प्रिये तु मोहरून घे

 ठोकरून मी दिले , हरेक बोल प्रीतिचे
 भेट फक्त आसवांचि , ओंजळी भरून घे

                                         ....... वैभव आलीम (३०/०३/१२)

Saturday 22 October 2011

जराही प्राण या देहात नाही (तरही गझल)



वृत्त - मृगाक्षी

(लगागागा लगागागा लगागा)



विसरणेही तुझ्या लक्षात नाही 
तुला मी तेवढा अज्ञात नाही 


सुरांना बनविले मी गीत माझे 
कुणी ऐकायला रस्त्यात नाही 


भुलावूनी मला वचनांमधे तू 
अता जागा म्हणे हृदयात नाही


सखे मी चिंब झालो आसवांनी
मनातूनी कशी तू जात नाही?


छबी माझी स्वत: जाळीन मी ही
पुन्हा होणार कोणा ज्ञात नाही 


कसा ठेवू भरोसा मी कुणावर?
अता सामर्थ्य हे शब्दात नाही 


अता ना मोल अश्रुंचे तुझ्याही 
जराही प्राण या देहात नाही 

..... वैभव आलीम (२०/१०/११)

काय सांगू ? (गझल)



वृत्त- मनोरमा

(गालगागा गालगागा)



दु:ख माझे काय सांगू ?
हास्य लाजे काय सांगू ?


मोरपंखी स्वप्न माझे 
अश्रु वाहे काय सांगू ?


शोध घेतो आजलाही 
मीच सांडे काय सांगू ?


साद माझी हरवलेली 
भास नुसते काय सांगू ?


तूच माझे स्वप्न होते
भंगलेले काय सांगू ?

...... वैभव आलीम (१२/१०/११)

ऊठ तू आता तरी (तरही गझल)




वृत्त-कालगंगा

( गालगागा गालगागा गालगागा गालगा )



षंढ म्हणती लोक सारे, ऊठ तू आता तरी
जाण बळ हातात न्यारे, ऊठ तू आता तरी


पेटवा अंगार आता, ऊजळू दे रात ही
घुमव क्रांतीचेच वारे, ऊठ तू आता तरी


का असा लाचार तू ? का प्रश्न ठेवी अंतरी?
मानसी का बावळारे? ऊठ तू आता तरी


ना कुणीही आपले रे, स्वार्थ आहे बाधला
विश्व नाही भास हा रे , ऊठ तू आता तरी


गुंफले मी शब्द माझे, जागवाया चित्त हे 
वैभवाचे बोल घ्यारे, ऊठ तू आता तरी

..... वैभव आलीम (०९/१०/११)

Thursday 29 September 2011

स्वप्नराती तुलाही सतावेन मी (गझल)


वृत्त - स्त्रग्विणी
(गालगा गालगा गालगा गालगा)


आठवूनी तुला, रात्र जागेन मी 
लोचनी आसवांना, विझावेन मी


तू जरी राहिली, दूर आता तरी 
स्वप्नराती तुलाही, सतावेन मी


लावला का लळा? सावरू मी कसा?
धुंद त्या आठवांनी, सुखावेन मी


वाटले ना मला, दूर जाशील तू
भावनांना अता, शांत ठेवेन मी


घाव तू घातले,लाख ऐसे तरी
वार कर काळजाशीच, संपेन मी 

....... वैभव आलीम (२८/०९/११)

Saturday 3 September 2011

अबोल प्रीत माझी




अबोल माझ्या शब्दांना 
अर्थ लाव तू जराशी 
मनातल्या हाकेला या
साद दे ग तू जराशी 


डोळ्यांतल्या भावनांना 
वाचुनी घे तू जराशी 
झुकलेल्या पापण्यांचा 
बोध घेई तू मनाशी 


जीव तुझ्यात गुंतला 
कसे सांगावे कुणाशी 
आयुष्याच्या संगतीला
सोबत तुझी हवीशी


गेलेल्या वाटेवरुनी 
परतुनी ये जराशी
अबोल माझ्या प्रीतीला 
समजून घे जराशी 

........ वैभव आलीम (०४/०७/११)

Thursday 18 August 2011

मैत्री ............



मैत्री म्हणजे ..
एक प्रवाह सरितेचा
मुक्तपणे वावरणारा 


मैत्री म्हणजे ..
एक किरण प्रकाशाचा
तिमिर नाशणारा


मैत्री म्हणजे ..
एक अनुभव निर्झराचा
मंजुळपणे खळखळणारा 


मैत्री म्हणजे ..
एक तरंग सागराचा 
किनाऱ्याची ओढ जपणारा 


मैत्री म्हणजे ..
एक सेतू दोन जीवांचा 
मला न तुला जोडणारा 

...... वैभव आलीम (०४/०७/११)

Wednesday 17 August 2011

आरसा कालचा ...(गझल)



वृत्त- स्त्रग्विणी
(गालगा गालगा गालगा गालगा)


दावला मी मला आरसा कालचा 
बदलला चेहरा हा कसा कालचा?


हरवली वाट माझी धुके दाटले 
शोधितो मी जरा कवडसा कालचा 


काय सांगू कुणा? कोणाला आळवू?
घेतला टाकलेला वसा कालचा 


पार्थ मी शस्त्र नाकारणारा रणी
सांगण्या कृष्ण यावा जसा कालचा 


जाहलो राख मी थंड आता जरी 
पेटत्या अग्निचा अंशसा कालचा 

.......... वैभव आलीम (१२/०८/११)

पहाटवारा सांगत होता



गीत प्रीतीचे गात होता 
साथीने तुझ्या बहरत होता 
चांदण्याला आज उत आला 
पहाटवारा सांगत होता 


केसांत मोगरा माळला होता 
रूपाने नभी चंद्र लाजला होता 
रातराणीचा सुगंध भरला 
पहाटवारा सांगत होता 


श्वासात मिसळला श्वास होता 
किर्रर्र रातीचा आभास होता 
समुद्र होता उधाणलेला 
पहाटवारा सांगत होता 


चंद्र मावळतीला झुकला होता 
ध्रुवतारा गगनी चमकला होता 
गोडवा सैलावणाऱ्या मिठीतला 
पहाटवारा सांगत होता 

.......... वैभव आलीम (१३/०८/११)

Friday 5 August 2011

दु:ख (गझल)


वृत्त-भुजंगप्रयात 
(लगागा लगागा लगागा लगागा)

मला दु:ख काही तसे फार नाही 
मनाने कधी मानली हार नाही 

अधूरी जरी राहिली जीत माझी 
नशीबा कधी तुजवरी भार नाही 

कधीही कुणी येवुदे उंबर्याशी 
घराचे कधी झाकले दार नाही 

तुला काय सांगू नशीबा कथा मी 
मरूनी जगावे व्यथा फार नाही 

जरा थांब रे जीवना आजसाठी
नव्याने कधी जन्म घेणार नाही 

....... वैभव आलीम (३१/०७/११)